बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी उद्या मंगळवार दि. 12 जुलैपासून सलग पाच दिवसांच्या कालावधीमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
भारतीय हवामान खात्याने उद्या मंगळवार दि. 12 ते शनिवार दि. 16 जुलै 2022 या कालावधीत उत्तर कर्नाटकाच्या अंतर्गत भागात पडणाऱ्या पावसाचा अंदाज पुढील प्रमाणे वर्तविला आहे. उद्या पहिल्या दिवशी मंगळवार दि. 12 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजेपर्यंत उत्तर कर्नाटक अंतर्गत भागातील बेळगाव, धारवाड आणि हावेरी जिल्ह्यात विविध ठिकाणी 64.5 ते 115.5 मि. मी. इतका मुसळधार पाऊस शक्य,
दुसऱ्या दिवशी बुधवार दि. 13 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजेपर्यंत उत्तर कर्नाटक अंतर्गत भागातील बेळगाव, धारवाड आणि हावेरी जिल्ह्यात विविध ठिकाणी 64.5 ते 115.5 मि. मी. इतका मुसळधार पाऊस शक्य,
तिसऱ्या दिवशी गुरुवार दि. 14 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजेपर्यंत उत्तर कर्नाटक अंतर्गत भागातील बेळगाव धारवाड आणि हावेरी जिल्ह्यात विविध ठिकाणी 64.5 ते 115.5 मि. मी. इतका मुसळधार पाऊस शक्य,
चौथ्या दिवशी शुक्रवार दि. 15 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजेपर्यंत उत्तर कर्नाटक अंतर्गत भागातील बेळगाव धारवाड आणि हावेरी जिल्ह्यात विविध ठिकाणी 64.5 ते 115.5 मि. मी. इतका मुसळधार पाऊस शक्य,
पाचव्या दिवशी शनिवार दि. 16 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजेपर्यंत उत्तर कर्नाटक अंतर्गत भागातील बेळगाव धारवाड आणि हावेरी जिल्ह्यात विविध ठिकाणी 64.5 ते 115.5 मि. मी. इतका मुसळधार पाऊस शक्य.