Sunday, November 17, 2024

/

वेगवेगळ्या अपघातात दोन ठार

 belgaum

टिळकवाडी येथील पहिले रेल्वे गेट ओलांडताना खाली पडल्यामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाला. मयत वृद्धाचे नांव प्रभाकर कब्बे (वय 86 वर्ष) असे असून ते सोमवार पेठ टिळकवाडी येथील रहिवासी होते.

घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी जाऊन पंचनामा केला आहे रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाकर कब्बे सकाळी साडेआठच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला जात होते

त्यावेळी गेट बंद असते वेळी गेट क्रॉस करून जात होते त्यावेळी येणाऱ्या ट्रेनचा आवाज ऐकू आला नसल्याने नसल्याने रेल्वे गाडीची त्यांना धडक बसली त्या धडकेत त्यांचा अंत झाला.

पहिले रेल्वे फाटक पडले असताना वाकून चालत जातेवेळी हा अपघात घडला आहे रेल्वे पोलिसांत याप्रकरणी या फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

ट्रक -दुचाकी अपघातात महिला जागी ठार

भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाल्याची घटना आज शनिवारी राष्ट्रीय महामार्गावर घडली. सदर महिला आझाद नगर बेळगाव येथील आहे. रिदाई फातिमा खुरेशी वय 23 असे तिचे नाव आहे.

 

पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आज दुपारी हा अपघात घडला. अपघातात भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे दुचाकीवर मागे बसलेली महिला रस्त्यावर जागीच ठार झाली. मयत महिला ही वडगाव येथील मुस्लिम समाजातील असल्याचे समजते. सदर अपघाताची काकती पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.