पहिले रेल्वे गेट टिळकवाडी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत बॅरिकेड हटवा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.यामुळे अनेक वर्षापासून सुरू असणाऱ्या मागणीकडे जिल्हाधिकारी नितेश पाटील लक्ष घालतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंगळवारी निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.तत्पूर्वी हातात फलक घेत निदर्शन करण्यात आली
पहिले रेल्वे गेट येथील बॅरिकेड्समुळे पादचारी, दुचाकी,चारचकी वाहनधारकांना नाहक त्रास होत असून वळून जावे लागत आहे. शालेय विद्यार्थी वयस्कर मंडळी तसेच व्यावसायिक व्यापारी या सर्वांनाच याचा त्रास होत असून तात्काळ बॅरिकेट्स हटवावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
बॅरिकेड्स हटवा पोलीस ठेवा
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी याठिकाणी कायमस्वरूपी पोलिस नेमण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दुसरे रेल्वे गेट तसेच तिसरे रेल्वे गेट येथे पोलिस आहेत मात्र पहिल्या रेल्वे गेट जवळ बॅरिकेड्स लाऊन नागरिकांची गैरसोय केली आहे.
धोकादायक वळण आणि अपघात
बॅरिकेट्स लावल्यामुळे या ठिकाणी धोकादायक वळण घेताना अपघाताचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या सोयीचा विचार करून तात्काळ येथील बॅरिकेट्स आठवावेत.शिवाय अनधिकृत रित्या उभारण्यात आलेले दुभाजक देखील अडचणीचे ठरत असून यामुळे नागरिकांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.
2016 पासून सुरू झालेली ही समस्या अजून पर्यंत ताटकळत तशीच असून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली