Friday, January 10, 2025

/

येथील दारू दुकानाचा वाढता उपद्रव…..

 belgaum

वडगांव येथील दारू दुकानांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे.सोनार गल्ली कॉर्नर येथे “सचिन वाईन्स” या नावाने दारू दुकान असून या ठिकाणी दारू पिण्यास येणाऱ्या व्यक्तींमुळे येथील नागरिकांना व परिसरातील व्यवसायिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी दारू पिणाऱ्या व्यक्तीमुळे परिसरातील वातावरण बिघडले आहे.

या ठिकाणी दारू पिण्यासाठी व्यक्ती घोळक्याने येत असतात ठीक ठिकाणी उभारून जोरजोरात ओरडणे,चर्चा करणे ,भांडणे करणे ,मारामारी करणे असे प्रकार देखील सातत्याचे बनत आहेत. परिणामी येथील शांतता भंग होत असून इतर व्यवसायिकांना तसेच येथील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

या ठिकाणी दारू दुकानांबरोबरच विविध व्यवसायिकांची देखील दुकाने आहेत मात्र दारू पिणाऱ्या व्यक्तींकडून सदर व्यवसायिकांच्या कट्ट्यावर बसून पान गुटखा खाणे.तसेच लघुशंका करणे,नशा करून झोपणे,विवस्त्र फिरणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत यामुळे येथील व्यावसायिकांवर त्याचा परिणाम होत असून यांचा काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी येथील व्यवसायिकांकडून केली जात आहे.Wines

या ठिकाणी मुख्य बस स्टॉप असून प्रवासी बसची वाट बघत या स्टॉप वर थांबलेले असतात, बऱ्याच वेळेला या ठिकाणी महिला प्रवासी देखील असतात मात्र दारू पिऊन त्या बस थांब्यावर येऊन महिलांची छेडछाड करणे तसेच येथील व्यवसायिकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना शिवीगाळ करणे असे प्रकार देखील सातत्याने घडत आहेत.

त्याच बरोबर या ठिकाणी चोरून दारू पिणाऱयांची संख्या ही मोठी आहे. इतर व्यावसायिकांच्या दुकासनासमोर आडव्या तिडव्या गाड्या लावून दारू पिण्यास जाणे व त्यांच्या बरोबर हुज्जत घालणे असे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी फक्त दारु विक्री चा परवाना असताना दारू पिण्यास दिले जाते त्या मुळे येथील दारू दुकान इतरत्र हलवावे अशी मागणी जोर धरू लागली आहे तरी संबधीत याबाबतची दखल घेत येथील दुकान बंद करावे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.