रक्ताच्या नात्यापेक्षा रेशमाच्या धाग्यांप्रमाणे मानलेली नाती अधिक घट्ट असतात हे दर्शविणाऱ्या कवियत्री मीरा यांच्या रेशीम बंध- आवर्तन दुसरे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक 21 जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जीएसएस कॉलेजच्या के एम गिरी सभागृहात होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री ऍड.रमाकांत खलब प्रमुख वक्ते म्हणून कोकणी भाषा निमंत्रक डॉक्टर भूषण भावे तर अध्यक्ष म्हणून तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकूर उपस्थित राहणार आहेत.
आयुष्यात मी कशी घडत गेले यावर प्रकाश टाकत आपल्याला भेटलेले लेखक ,कवयित्री, नातेवाईक तसेच इतर व्यक्ती यांच्या व्यक्तिचित्रणाचे हे पुस्तक असून यामध्ये एकूण 23 व्यक्तिचित्रणे आहेत.
रेशीम बंध आवर्तन पहिले यामध्ये एकूण 25 व्यक्तिचित्रणे असून या पुस्तकाचा दुसरा भाग म्हणजेच रेशीम बंध आवर्तन दुसरे प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती कवयित्री मीरा यांनी दिली.
साठी उलटलेली मी, आता मागे वळून पाहत असताना आपल्याला भेटलेल्या अनेक व्यक्ती आणि आपण त्यांच्यामुळे कसे घडलो याचा विचार करत असताना या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.