पिरनवाडी येथील शिवभक्तांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत प्रथमच बांदल सेना शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
पावनखिंड या चित्रपटानंतर प्रामुख्याने बांदल सेना आणि त्याचे कार्य याबाबत सविस्तर माहिती मिळाल्यामुळे बांदल सेना शौर्य दिन साजरा करण्यात आला.
ना आमंत्रण, ना विशेष अतिथीचा मान मात्र या बांदल सेना शौर्य दिनाला रत्नागिरी येथून जि. प. अध्यक्ष रोहन सुभाष बने उपस्थित होते.प्रथम त्यांच्या हस्ते पिरणवाडी चौकातील शिव पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर सुभाष बने आणि संतोष जैनोजी यांनी बांदल सेना शौर्यगाथा याविषयी शिवभक्तांना माहिती सांगितली.
यावेळी बोलताना रोहन सुभाष बने यांनी सोशल मीडियावर बांदल सेना शौर्य दिन येथे पिरनवाडी येथे साजरा करण्यात येणार असल्याचे वाचनात आल्याने या ठिकाणी उपस्थित राहिल्याचे सांगितले. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजू मुचंंडीकर यांनी केले. विजयानंद नेसरकर यांनी आभार मानले. पिरणवाडी, नावगे, मच्छे, खादरवाडी, हुंचेनहट्टी येथील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पावसाची रिप रिप सुरू असताना देखील सकाळच्या सत्रातील या शौर्यगाथा दिनाचा कार्यक्रम सोहळा शिवभक्तांनी आपली उपस्थिती दर्शवत मोठ्या उत्साहात साजरा केला.