श्रीराम हिंदुस्तान तर्फे सुरू झालेल्या 24 तास मदत योजनेला शुक्रवारी सकाळपासून सुरुवात झाली आहे. संत धार सुरू असताना वडगाव पाटील गल्ली येथील पाटील कुटुंबिय यांच्या जुन्या घराचा काही भाग कोसळला.
सदर बातमी श्रीराम संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजताच संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी शुक्रवारी सकाळी पाटील गल्ली येथे घर पडलेल्या ठिकाणाला भेट दिली.
यावेळी श्रीराम संघटनेचे कार्यकर्ते तसेच मराठा समाजाचे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सागर पाटील व अमोल देसाई उपस्थित होते.
या भागाची पाहणी करत सदर कुटुंबीयांना प्रशासनातर्फे मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली आणि तात्काळ याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे सदर कुटुंबियांना मदत मिळावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांना भेट देऊन याबाबतची माहिती दिली आहे.सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळली आणि आतील घराचा काही भाग कोसळला.
सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरीही पाटील कुटुंबियांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राम सेना संघटनेने सुरू केलेल्या या 24 तास मदती योजनेच्या कार्याला आता सुरुवात झाली असून प्रथमच वडगाव येथून संबंधित घर पडणाऱ्या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यामुळे सदर कुटुंबीयांची अडचण कमी झाली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून 24 तास मदत जाहीर केलेल्या श्रीराम सेनेच्या कार्याबद्दल संघटनेच्या कार्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे