हनुमाननगर येथील कु. निवेदिता नारायण मोहनगेकर हिने अलीकडेच झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेत गुणवत्तेत उत्तीर्ण होत उज्वल यश संपादन केले आहे
मूळचे कंग्राळी खुर्दचे असलेले आणि सध्या हनुमाननगर येथे राहणारे प्रतिष्ठित नागरिक अभियंता नारायण भावकाणा मोहनगेकर यांची कन्या असलेल्या निवेदिता ही सी ए परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण महिला विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल आणि माध्यमिक शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल येथे झाले आहे. त्याचप्रमाणे पदवीपूर्व शिक्षण लिंगराज कॉलेजमधून पूर्ण केल्यानंतर लागलीच चेन्नई येथून तिने सीपीटी (सीए एंट्रन्स) परीक्षा उत्तीर्ण केली.
या पद्धतीने चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठीचा पाया घातल्यानंतर निरंतर सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रम घेत निवेदिताने गेल्या मे 2022 मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेत उत्तम गुणवत्तेसह सुयश मिळविले आहे.
आपल्या या यशास सीए क्षेत्रातील गुरूंचे मार्गदर्शन तसेच वडिल नारायण, आई नम्रता, भाऊ निरंजन, संपूर्ण मोहनगेकर कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणी यांचे प्रोत्साहन कारणीभूत ठरल्याची प्रतिक्रिया निवेदिता मोहनगेकर हिने दिली.
Congratulations on your success in the exam, keep it up.