बेळगाव पोलीस हेडकॉटर मधील जुन्या पिस्तूल आणि बंदुकांची पाहणी करत बेळगावच्या या पोलीस संग्रहालयाला दिल्लीच्या धर्तीवर राष्ट्रीय स्तरावरील पोलीस म्युझियम करूया असे आश्वासन कर्नाटकाचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी दिले.
बुधवारी सायंकाळी बेळगाव दौऱ्यावर आलेले राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी बेळगाव जिल्हा पोलीस मुख्यालयास भेट दिली. त्यावेळी बेळगाव जिल्हा कार्यालय आवारात त्यांचे आगमन झाल्यानंतर जिल्हा पोलिसांनी त्यांना सलामी देत त्यांचं जोरदार स्वागत केलं.
यावेळी पोलीस समुदाय भवनात असलेल्या पोलीस म्युझियमला त्यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी जुन्या बंदुका, शस्त्रास्त्रे हेल्मेट जुन्या पिस्तूल आदी पोलीस खात्याच्या वतीने वापर केलेल्या सगळ्या जुन्या सामग्रीची त्यांनी पाहणी केली.
बेळगाव पोलिसांचे कौतुक
यावेळी मोह आवरत नसल्याने गृहमंत्र्यांनी चक्क बंदूक हातात घेऊन म्युझियमची पाहणी करत कौतुक केल. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बेळगाव पोलिसांच्या विशेष प्रयत्नातून आम्ही एक पोलीस संग्रहालय तयार करणार आहोत. एक चांगल्या पद्धतीने बेळगाव पोलिसांनी हे म्युझियम तयार केलेले असून जुन्या सगळ्या वस्तू जतन करून ठेवल्या आहेत.दिल्लीच्या धर्तीवर राष्ट्रीय स्तरावरील पोलीस संग्रहालय बेळगावात निर्माण करू असे त्यांनी सांगितले.
यावेळी आय जी पी सतीश कुमार नूतन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील पोलीस आयुक्त डॉ एम बी बोर्लिंगय्या या डीसीपी रवींद्र गडादी पी व्ही स्नेहा, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी सह अन्य पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या आरोपींना पकडण्यामध्ये रामदुर्ग पोलिसांनी जे साहस दाखवले त्या सहजाच कौतुक देखील गृहमंत्र्यांनी केलं त्या पोलिसांना अभिनंदन पर पत्र देखील देण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले सध्या 5000 पोलीस कॉन्स्टेबल ची भरती सुरू असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केल.
का मी काही दिवसांमध्ये पोलीस दलात सेवा बजावत असलेल्यांसाठी 2000 कोटी रुपये खर्च करून आवाज घरे बांधून देण्यात येणार आहेत असे सांगत त्यांनी नमूद केलं.