प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण -मध्य रेल्वेने नांदेड आणि हुबळी दरम्यान सहा साप्ताहिक स्पेशल रेल्वे गाड्यांची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पेशल रेल्वे सेवेचा तपशील खालील प्रमाणे आहे.
रेल्वे क्र. 07635, नांदेड ते हुबळी शनिवार दुपारी 2:10 वाजता. रेल्वे धावण्याचे दिवस दि. 16, 23 आणि 30 जुलै 2022. बेळगाव रेल्वे स्थानकावर पहाटे 5 वाजता आगमन आणि 05:05 ला प्रस्थान. रेल्वे क्र. 07636,
हुबळी ते नांदेड शनिवारी रात्री 11:15 वाजता. रेल्वे धावण्याची दिवस दि. 17, 24 व 31 जुलै 2022. रेल्वे क्र. 07635 /07636 नांदेड -हुबळी -नांदेड स्पेशल्स :(06 सेवा).
पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी गाव, कुरुंदवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घटप्रभा, बेळगाव, लोंढा आणि धारवाड या रेल्वे स्थानकांवर उपरोक्त स्पेशल रेल्वेंचे थांबे असणार आहेत.
उपरोक्त सर्व स्पेशल रेल्वे गाड्यांना एसी फर्स्ट क्लास, एसी टू टायर, एसी थ्री टायर, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास कोचेस अर्थात डबे असणार आहेत.