कागवाड मतदारसंघांतर्गत येणाऱ्या कुसनाळ आणि मोळवाड गावांना कागवाडचे आमदार व माजी मंत्री श्रीमंत (तात्या) पाटील यांनी भेट देऊन वाढत्या पाण्याची पाहणी केली
कुसनाळ ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या व त्यांच्या समस्यांना योग्य उत्तरे दिली.
पूर आल्यास गावकऱ्यांना निवारा केंद्रात नेण्यासाठी बोटीची व्यवस्था करण्याची विनंती गावातील नेत्यांनी त्यांच्याकडे केली. घटनास्थळावरुनच आमदारांनी जिल्हाधिकार्यांशी दूरध्वनीवरून बोलून कुसनाळ गावासाठी लवकरच बोटीची व्यवस्था करण्याची सूचना केली,
तसेच पूर वाढल्यास पूरबाधित तुमची सर्वतोपरी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले यासाठी सर्व सुविधांसह निवारा केंद्रांची सोय करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पावसातच
स्थानिकांसह बोटीने जाऊन कृष्णा नदीच्या पूरस्थितीची पाहणी केली
आमदार श्रीमंत पाटील यांनी मोळवाड येथील ग्रामस्थांचीही भेट घेऊन पूर वाढल्यास जनतेला कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी ग्रामस्थांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले.
यावेळी तालुका प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, दोन्ही गावांमधील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.