दुग्ध महामंडळ अर्थात केएमएफने दही, ताक आणि लस्सीच्या दरात कपात केली आहे.मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सूचनेनुसार सदर कपात करण्यात आली असून आज पासून कपात करण्यात आलेल्या घरात सदर दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यात येणार आहे ,यामुळे नागरिकांना आता पूर्वीच्या दरात हे पदार्थ उपलब्ध होणार आहेत.
पूर्वीच्या दरात केंद्र सरकारने पॅकेज्ड दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर जीएसटी लादल्यामुळे केएमएफने दही, ताक, लस्सीच्या दरात वाढ केली होती. परिणामी प्रत्येक पदार्थ खरीदीसाठी दीड ते दोन रुपये अधिक मोजावे लागत होते.
परिणामी दुग्धजन्य पदार्थांचे दर वाढतात राज्यात या निर्णयावर टीका करण्यात आली. त्यामुळे त्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई यांनी दरात कपात करण्याची सूचना केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या कर्नाटक दूध महामंडळाने आपल्या दग्धोत्पादनांच्या दरात कपात केली आहे.
काल संध्याकाळपासून ही दरकपात लागू करण्यात आली आहे. यामुळे 10 रुपयांच्या 200 ग्रॅम दह्याच्या पॅकेटसाठी 12 रुपये इतका दर वाढवला होता. तो आता त्यांनी 10 रुपये 50 पैसे इतका कमी केला आहे.
200 मिली ताकाचे पाकीट जे 7 रुपये होते ते 8 रुपये करण्यात आले होते. आता ते 7 रुपये 50 पैसे कमी केले आहेत. त्याचप्रमाणे 200 मिली लस्सीचे पॉकेट जे 10 रुपये होते ते 11 रुपये करण्यात आले.
आता त्यांनी 10 रुपये 50 पैसे इतके कमी केले आहे.परिणामी आता दुग्धजन्य पदार्थ पूर्वीच्या दरातच उपलब्ध होणार आहेत.