अवघ्या सव्वा महिन्यावर येऊन ठेवलेल्या गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची बैठक आयोजित केली होती. मंगळवारी सायंकाळी सदर बैठक होणार होती मात्र काही तांत्रिक कारणास्तव सदर बैठक रद्द करण्यात आली आहे.याबाबतची गणेश महामंडळ जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी व सुनील जाधव यांनी दिली आहे.
बेळगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव राज्यातला एक मोठा उत्सव असतो. मुंबईच्या धर्तीवर बेळगावमधील गणेशोत्सव साजरा केला जातो. यामुळे काही दिवसावर येऊन ठेपलेल्या या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव शिस्तीने व व्यवस्थितरित्या पार पाडावा यासाठी पोलीस प्रशासनाने मार्केट एसीपी कार्यालयात सदर बैठक आयोजित केली होती .मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे सदर बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.
मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला होता यावर्षीचा यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात होणारा असून याच्या पार्श्वभूमीवर सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बेळगावच्या गणेशोत्सवाला महत्त्वपूर्ण परंपरा असून विसर्जन मिरवणूक हा तर हे तर बेळगावच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.
यामुळेच सव्वा महिना गणेशोत्सव असताना देखील पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून लवकरात लवकर बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीमध्ये नेमके यावर्षीच्या गणेशोत्सवात कोणत्या पद्धतीने साजरा करायचा कसा साजरा करायचा याबद्दल चर्चा होणार होती.गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलीस अधिकारी मार्गदर्शन करणार होते मात्र तूर्तास बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.