बेळगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव कर्नाटक राज्यातला एक मोठा उत्सव असतो महाराष्ट्राच्या धर्तीवर बेळगावमधील गणेशोत्सव साजरा केला जातो आगामी काही दिवसावर येऊन ठेपलेल्या या गणेश उत्सवाच्या बाबतीत पूर्व तयारी म्हणून पोलीस प्रशासन बैठक घेणार आहे.
आज मंगळवारी सायंकाळीचार वाजता मार्केट एसीपी कार्यालयामध्ये सार्वजनिक गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी बैठकीसाठी बोलावलं आहे.
बैठकीमध्ये नेमके यावर्षीच्या गणेशोत्सवात कोणत्या पद्धतीने साजरा करायचा कसा साजरा करायचा याबद्दल चर्चा होणार आहे गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे गणपती उत्सव म्हणावा तेवढा मोठ्या उत्साहात गर्दीने साजरा करण्यात आला नव्हता मात्र यावर्षी कोरोनाचा नायनाट झाल्याने उत्सव मोठ्याने साजरा केला जाणार आहे.
गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पोलीस अधिकारी नेमकं काय मार्गदर्शन करतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.