सकल मराठा समाजाच्या गुरुवंदना कार्यक्रमाचे फलित म्हणजे, बेंगळूर मध्ये मराठा समाज विकास प्राधिकरणाला मिळालेली चालना होय. नुकताच बंगळुरू येथे मराठा विकास प्राधिकरणाची अधिकृत स्थापना आणि लोगोचे अनावरण करण्यात आले.
बेळगावसह विविध ठिकाणी झालेल्या गुरूवंदना कार्यक्रमामुळे समाज एकवटला ही नक्कीच सकारात्मक गोष्ट. समाज एकवटला आहे हे मराठा समाजाने सरकारला दाखवून दिले आहे.स्वामी मंजुनाथ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या गुरुवंदना कार्यक्रम मराठा समाजासाठी लाभदायक ठरला.
बेळगाव मध्ये मराठा समाजाचा प्रभाव अधिक असून, या ठिकाणी भव्य दिव्य असा सकल मराठा समाजाचा गुरुवंदना कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर सरकारने याची दखल घेत मराठा समाज विकास प्राधिकरणाची स्थापना करून लोगोचे अनावरण केले आहे.त्यामुळे ही बाब मराठा समाजासाठी सकारात्मक आहे.
मुख्यमंत्री बोम्मई यांनी प्राधिकरण उदघाटन कार्यक्रमात बोलताना कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजासाठी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे भविष्यात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत देखील चर्चा सुरू झाली आहे.एकूण मागे पडलेल्या मराठा समाजाला विकास प्राधिकारणाच्या माध्यमातून ऊर्जा मिळणार आहे.
स्वामी मंजुनाथजी यांनी सांगितल्याप्रमाणे गुरुवंदना या कार्यक्रमानंतर मराठा समाजाला फलित मिळेल,त्यानुसार गुरू वंदनाच्या काही महिन्यांतच हा कार्यक्रम पार पडताच सरकारला याची दखल घ्यावी लागली आहे.
दीड वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मराठा समाजाच्या विकासासाठी नवीन प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली होती. या घोषणेला दीड वर्षाचा कालावधी उलटला तरी देखील कोणतेही फलित झाले नव्हते. याबाबत केवळ अध्यक्ष नेमला गेला होता मात्र मोठी हालचाल झाली नव्हती परिणामी केवळ निवडणुकीसाठीं मराठा मतावर डोळा ठेऊन ही घोषणा गेली जाते असे बोलले जात होते .
मात्र आता मराठा समाज विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्याने मराठा समाजाच्या विकासाच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे दिसून येत आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ याप्रमाणे मराठा समाजाने एकत्रित येऊन प्रगतीच्या दृष्टिकोनातून पावले उचलणे गरजेचे आहे .
आता बेळगाव आणि भागामध्ये मराठा समाज विखरलेला असून या समाजाला एकवटण्याच्या दृष्टिकोनातून देखील सकल मराठा समाजातर्फे कार्य करण्यात येणार आहे. समाज एकवटला की नेमकी सकारात्मक गोष्ट घडते हे मराठा समाजाने अधोरेखीत करत आरक्षणासाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे.त्याच अनुषंगाने राज्यात विखुरलेला मराठी समाज एकत्रित करण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत.