जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी दशेत असतानाच ध्येय निश्चित करून त्याला कष्टाची जोड दिली गेली पाहिजे असे मार्गदर्शनपर विचार लोंढा हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. डी. पाटील यांनी व्यक्त केले.
मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेतर्फे आयोजित सभासदांच्या गुणी मुला मुलींचा गौरव समारंभ आज शनिवारी दुपारी मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात प्रमुख वक्ते या नात्याने एन. डी. पाटील बोलत होते. बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभप्रसंगी व्यासपीठावर बँकेच्या संचालक बाळासाहेब काकतकर, सह संचालक आदी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शन पर भाषण मुख्याध्यापक पाटील यांनी मुलांनी विद्यार्थी दशेत असतानाच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे अपयशावर मात करण्यासाठी प्रत्येकाकडे बी प्लॅन तयार असायला हवा देशाचे नव्हे तर जगाचे नेते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे देखील प्रत्येक लढाईसाठी ए प्लॅन बरोबर बी प्लॅन तयार असायचा असे सांगून ध्येय निश्चिती बरोबरच त्याला कष्टाची जोड दिली गेली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या पालकांच्या पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे ही भावना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात असली पाहिजे ही लक्ष्मण रेषा आखली की यश आपल्या हातात असतं, असे पाटील यांनी सांगितले.
प्रारंभी संचालक बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थित सर्वांचे स्वागत करण्याबरोबरच पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर मुख्याध्यापक एन डी पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यातद्वारे समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांच्या हस्ते मुख्याध्यापक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे जनरल मॅनेजर संतोष धामणकर यांनी सत्कारमूर्तींना पुष्पगुच्छ प्रदान केला.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सभासदांच्या गुणी विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. अखेर चेअरमन दिगंबर पवार यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर बी. एस. पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने समारंभाची सांगता झाली. आजच्या या समारंभात मराठा बँकेच्यावतीने सभासदांच्या दहावी आणि बारावीत सुयश मिळवलेल्या तब्बल 169 गुणी मुला-मुलींना गौरविण्यात आले हे विशेष होय. समारंभास निमंत्रितांसह बँकेचे सभासद, पालक आणि विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी संचालक बाळाराम पाटील,सुशील खोकाटे, सुनिल अष्टेकर ,लक्ष्मण होनगेकर,बी एस पाटील,शेखर हंडे,रेणू किल्लेकर, विनोद हांगीरकर, मोहन चौगुले,लक्ष्मण नाईक आदी उपस्थित होते.पायोनिअर अर्बन बँकेचे माजी संचालक विकास कलघटगी आणि बेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांचा शाल आणि स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
ध्येय बाळगा आणि कष्ट करा यश मिळणारचं-विद्यार्थ्यांना एन डी पाटील यांनी केलं मार्गदर्शन|Belgaum Live|
मराठा बँकेच्या वतीनं 169 दहावी आणि बारावीत यश संपादन केलेल्या सभासदांच्या गुणी विध्यार्थ्यांचा गौरव- pic.twitter.com/wmxr3QD7AZ
— Belgaumlive (@belgaumlive) July 23, 2022