Monday, December 30, 2024

/

श्री मंगाई यात्रा म्हणजे अर्थ, समाज, धर्मकारण साधणारी यात्रा

 belgaum

वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीची यात्रा ही प्रामुख्याने शेतकरी, कामगार, विणकर वगैरे कष्टकरी लोकांची यात्रा असली तरी या यात्रेमुळे मोठ्या प्रमाणात अर्थकारण, समाजकारण आणि धर्मकारण साधले जाते, अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी दिली.

श्री मंगाई देवी यात्रा उत्सवाचा आज मंगळवार मुख्य दिवस असल्याच्या पार्श्वभूमीवर यात्रास्थळी सदर यात्रेचे जाणकार व साहित्यिक गुणवंत पाटील बेळगाव लाईव्हशी बोलत होते. श्री मंगाई देवी यात्रा पूर्वी प्रामुख्याने फक्त वडगाव आणि परिसरातील लोक साजरी करत होते. मात्र कालांतराने ही यात्रा संपूर्ण बेळगावची झाली आहे. या यात्रेला 200 ते 250 वर्षाचा इतिहास आहे. फार पूर्वी या देवस्थानाच्या ठिकाणी कांही महिला सती गेल्या होत्या. या सतींचे पावित्र्य जपत ही यात्रा भरवली जाते, असे पाटील यांनी सांगितले.

सदर यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेदरम्यान अर्थकारण, समाजकारण आणि धर्मकारण हे तीनही प्रकर्षाने जाणवते. प्रत्येक यात्रेचा उद्देश हा लोकांना एकत्र जमा करणे हा असतो. लोकांनी भेदभाव विसरून संघटितपणे उत्सव साजरा करावा, आपली मतं सुखदुःख एकमेकांमध्ये वाटावीत, यासाठी यात्रोत्सव भरविला जातो. श्री मंगाई यात्रेसाठी प्रामुख्याने सासरी असलेल्या नवविवाहिता माहेरवाशीनी होतात.Mangai yatra

त्या आपल्या आई-वडिलांकडे येतात नव्या जावयांना घरी बोलावून उत्तम पाहुणाचार केला जातो. यात्रेसाठी बेळगाव शहर परिसर व परगावातील भावीक मोठ्या संख्येने वडगावात येत असल्यामुळे येथील अर्थकारण चांगल्या प्रकारे चालते. विशेष म्हणजे लाखोच्या संख्येने लोक यात्रेसाठी जमत असून देखील कोठेही दंगा, भांडण-तंटे वगैरे अनुचित प्रकार घडत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

श्री मंगाई देवी यात्रा ही प्रामुख्याने शेतकरी, कामगार, विणकर या कष्टकरी लोकांची आहे. सदर यात्रेनिमित्त देवदर्शन घेण्याबरोबरच या कष्टकरी मंडळींना आपले कुटुंबीय नातलकांसोबत कांही काळ आनंदात घालवून विरंगुळा मिळण्याबरोबरच त्यांचा श्रमपरिहारही होतो. ही मंडळी श्री मंगाई यात्रेसाठी वर्षभर पैशाची साठवण करतात.

येथील फंड यात्रे दिवशीच फुटतात असे सांगून यात्रेच्या मुख्य दिवशी वडगाव परिसरातील लोकांच्या आनंद सुख-समृद्धीसाठी गाऱ्हाणे घातले जाते. तत्पूर्वी एक महिना देवीला विश्रांती दिली जाते. त्यानंतर गाऱ्हाणे उतरवण्याचा कार्यक्रम होतो, असेही गुणवंत पाटील यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.