प्रेम म्हणजे काय असतं, तुमचं आमचं सेम असतं.
अशी ही प्रेमाबद्दलची संकल्पना. अनेक भावनांमध्ये प्रेम ही भावनाच वेगळी. त्याने तिच्यावर प्रेम केले,तिनेही त्याच्यावर जीवापाड प्रेम केले. सुखी संसाराची स्वप्ने बघत असतानाच, काहीतरी बिनसलं आणि सारं होत्याचं नव्हतं झालं. प्रियकराने आपल्या प्रेयसीचा खून केल्यानंतर स्वतः देखील आत्महत्या करून जीवन संपविल्याची खळबळजनक घटना शहरातील बसव कॉलनी येथे आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
बसव कॉलनीत घडलेली ही घटना.तो पीएसआय होण्याचे तयारी करत होता तर ती नर्सिंग चे शिक्षण घेत होती .
प्रियकराचे नांव रामचंद्र बसाप्पा तेणगी (मुळ रा. सौंदत्ती) असे आहे. तर प्रेयसी रेणुका बेळगावमध्ये नर्सिंगचा कोर्स करत होती. एकमेकांवर त्यांचे जिवापाड प्रेम होते मात्र घरच्यांचा या प्रेमासाठी आणि लग्नासाठी विरोध झाल्यामुळे रेणुका ने रामचंद्रला नकार दिला आणि याचाच राग मनात धरत त्या प्रियकराने प्रियसी रेणुकाचा खून केला आणि स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रेम हे आंधळ असतं असं म्हटलं जातं आणि याचाच प्रत्यय बसव कॉलनी पाहायला मिळाला दोघेही उच्चशिक्षित. पुढील वाटचालीची स्वप्न पाहणारे मात्र केवळ प्रियसीने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे निर्माण झालेल्या गैरसमजातून ही घटना घडली आणि दोन जीव एक होण्या आधीच या जगातून निघून गेले.
रामचंद्रने बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. पीएसआय होण्याच्या दृष्टिकोनातून त्याची तयारी सुरू होती. त्याच्या घरच्यांकडून देखील त्याला यासाठी पूर्ण प्रोत्साहन देण्यात आले होते. मात्र दुसरीकडे रेणुका आणि रामचंद्र चे एकमेकांशी सूत जुळले होते सारं व्यवस्थित सुरू होतं.मात्र केवळ प्रेम असून देखील लग्न करण्यास तिने विरोध केल्यामुळे उच्च शिक्षणाकडे वाटचाल करणारा एक तरुण नाराज झाला आणि रागाच्या भरात त्याने नर्सिंग करत असणाऱ्या रेणुकाच्या बसव कॉलनीतील रूमवर जाऊन तिची गळा आवळून हत्या केली.
या प्रकाराबद्दल रामचंद्र यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोणतीच कल्पना नव्हती. काल रात्रीच त्याचे आपल्या कुटुंबीयांशी बोलणे झाले होते.याउलट रेणुकाच्या घरी त्यांच्या प्रेमास विरोध होत असल्याने तिने प्रेम करून देखील त्याच्यासोबत विवाह करण्यास नकार दिला.परिणामी हा सारा प्रकार घडला आहे.
याबाबतची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे सीपीआय मंजुनाथ हिरेमठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आला.
.