भारतीय आयुर्विमा मंडळाच्या गोवा येथील कार्यालयातील कंपाउंड मध्ये झाडलोट करत असलेल्या एका महिलेचा, इमारतीत पार्किंगमधून बाहेर काढत असलेल्या गाडीने ठोकर दिल्याने दुर्दैवी अंतः झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गोवावेस सर्कल जवळ घडली.
अनिता राजेश बनसे वय 51 रा बेळगाव असे या महिलेचे नाव असून ती एलआयसी कार्यालयामध्ये सकाळी झाडलोटचे काम करायला आली होती घटनास्थळी रहदारी दक्षिण पोलिसांनी भेट दिली देऊन पंचनामा केला आहे.
या घटनेसंदर्भात समजलेल्या अधिक माहितीनुसार आयुर्विमा महामंडळाच्या ऑफिसमध्ये इमारतीतील बेसमेंट मध्ये अनेक गाड्या पार्किंग केल्या जातात सकाळी जोरदार वेगाने बाहेर पडणाऱ्या या कारचे गाडीचे नियंत्रण सुटून गाडी सदर महिलेच्या अंगावर गेली आणि त्यातच त्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला. ही घटनापाहण्यासाठी बघायची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
शुक्रवारी सकाळी सकाळी घडलेल्या घटनेच्या आणि एकंदर वातावरणाचा परिणाम लोकांच्यावर खूप दिसून आला लोकांच्या मनात हळूहळू व्यक्त होत होती आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात साफसफाई करताना या कर्मचारी महिलेचा मृत्यू अशा दुर्देवी पद्धतीने व्हावा याचे लोकांना फार वैश्यम वाटत होते.
सदर चार चाकी वाहन चालक इसम हा बेसमेंटच्या पार्किंग मधून बाहेर काढत होता त्यावेळी अचानक गाडीवरचा ताबा नियंत्रण गेल्याने समोर गाडी कंपाऊंड वॉल आणि काम करणाऱ्या महिलेला धडकली या घटनेत महिला ठार झाली गाडी इतकी वेगात होती कारचेही समोरील डॅशबोर्ड बेंड होऊन तुटून पडले होते इतक्या वेगाने ही गाडी त्या महिलेला आदळली होती.
शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांनी घटनास्थळी बघायला गर्दी केली होती. एकूणच लाईफ इन्शुरन्सच्या कार्यालयाच्या आवारात एकट्याची लाईफ जाणे ही घटना म्हणजे दैवदुर्विलास आहे.गाड्यांचे अपघात केवळ रस्त्यावर होतात असे नाही तर वेळ भरून आली की कार्यालयाच्या कंपाऊंड मध्येही अश्या घटना होतात.
Driver should pubish