महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात पडणारा मुसळधार पाऊस लक्षात घेता अलमट्टी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे आज बुधवारी दुपारी 3 वाजल्यापासून अलमट्टी धरणातून 1,00,000 ते 1,25,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. संपुर्ण बेळगाव जिल्ह्यात आज सकाळी 8:30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात एकूण 13.4 मि.मी. पाऊस झाला असून खानापूर तालुक्यात सर्वाधिक तर रामदुर्ग तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.
अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण 1.25 लाख क्युसेक्सपर्यंत वाढणार असल्यामुळे धरणाच्या खालच्या अंगाला असलेल्या नदी काठावरील गावांमधील जनतेला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्वांनी सतर्क राहून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख धरणामधील पाणीसाठ्यामध्ये पावसामुळे झालेली वाढ याबाबतची माहिती (अनुक्रमे धरणाचे नांव, पाणीसाठा क्षमता, सरासरी पाणीसाठा, सध्याचा पाणीसाठा, धरणात येणारे पाणी, शेकडा टक्केवारी, पाणी विसर्ग. यानुसार) पुढील प्रमाणे आहे.
हिडकल धरण : 51 टीएमसी, 19.125 टीएमसी, 17.105 टीएमसी, 19693 क्यूसेक्स, 37.5 टकके 114 क्यूसेक्स. नवलतीर्थ धरण : 37.73 टीएमसी, 16.329 टीएमसी, 12.944 टीएमसी, 8400 क्यूसेक्स, 43.27 टक्के, 194 क्यूसेक्स. मार्कंडेय धरण : 3.696 टीएमसी, 1.624 टीएमसी, 1.113 टीएमसी, 1101 क्युसेक्स, 43.93 टक्के, 0 क्यूसेक्स. महाराष्ट्रातील कर्नाटकाशी संबंधित प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती (अनुक्रमे धरणाचे नांव, सरासरी पाणीसाठा, सध्याचा पाणीसाठा, शेकडा टक्केवारी, यानुसार) पुढील प्रमाणे आहे. कोयना धरण : 105.25 टीएमसी, 38.49 टीएमसी, 36.57 टक्के. वारणा धरण : 34.4 टीएमसी, 20.53 टीएमसी, 59.68 टक्के. राधानगरी धरण : 8.36 टीएमसी, 4.84 टीएमसी, 57.89 टक्के. कणेर धरण : 10.1 टीएमसी, 3.71 टीएमसी, 36.79 टक्के. धोम धरण : 13.5 टीएमसी, 5.98 टीएमसी, 44.29 टक्के.
बेळगाव जिल्ह्यात जुलै महिन्यात या दिवशी सरासरी 4.8 मि. मी. पावसाची नोंद होते मात्र आज ती 13.4 मि. मी. इतकी झाली आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस खानापूर (50.4 मि.मी.) तालुक्यात तर सरासरी पेक्षा कमी पाऊस रामदुर्ग (2.3 मि.मी.) तालुक्यामध्ये नोंद झाला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आज बुधवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची नोंद (अनुक्रमे तालुक्याचे नांव, सर्वसामान्य पाऊस, सध्या पडलेला पाऊस यानुसार) पुढीलप्रमाणे आहे.
अथणी : 1.7 मि.मी. -6.8 मि.मी., बैलहोंगल : 4.8 मि.मी. -7.7 मि.मी., बेळगाव : 10.4 मि.मी. -20 9 मि.मी., चिक्कोडी : 4.6 मि. मी. 20.7 मि.मी., गोकाक : 1.6 मि.मी. -3.1 मि.मी. हुक्केरी : 1.7 मि.मी. -7.6 मि.मी., खानापूर : 14.3 मि.मी. -50.4 मि.मी., रामदुर्ग : 2.4 मि.मी. -2.3 मि.मी., रायबाग : 1.2 मि.मी. -106.मि.मी., सौंदत्ती : 2.5 मि.मी. -3.7 मि.मी., कित्तूर : 6.9 मि.मी. -14.5 मि.मी. निपाणी : 4.5 मि.मी., 18.7 मि.मी., कागवाड : 2.2 मि.मी. 4.7 मि.मी., मुडलगी : 1.7 मि.मी. -4.5 मि.मी.