येत्या कांही वर्षात बेळगावमध्ये 400 बेड्सचे जयदेव हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असून या हॉस्पिटलचा कोनशीला समारंभ येत्या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते होईल, अशी माहिती जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्स अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सी. एन. मंजुनाथ यांनी म्हैसूर येथे दिली.
राज्य सरकारने डॉ. सी. एन. मंजुनाथ यांचा कार्यकाळ आणखी एक वर्षाने वाढविल्याबद्दल जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्स अँड रिसर्च सेंटर संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना डॉ. मंजुनाथ बोलत होते. बेळगाव येथे जयदेव हॉस्पिटल सुरू करण्याची माहिती देण्याबरोबरच म्हैसूर सेंटर मधील चौथी कॅथ लॅब सुविधा येत्या दोन महिन्यात सुरू केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.