Thursday, December 5, 2024

/

जय गणेश’ चा श्रावणोत्सव -2022; महिलांसाठी पर्वणी

 belgaum

दरवर्षीप्रमाणे शहरातील सुप्रसिद्ध जय गणेश होलसेल साडी डेपोतर्फे ‘श्रावणोत्सव -2022’ चे आयोजन करण्यात आले असून महिलांना साडी खरेदीसाठी हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच ठरली आहे.

जय गणेश होलसेल साडी डेपोचा हा श्रावण उत्सव यंदा 16 व्या वर्षात पदार्पण करत आहे. श्रावण मासात नात्यांचा धागा अधिक मजबूत व्हावा या उद्देशाने जय गणेश होलसेल साडी डेपोतर्फे यंदा देखील ‘शुभारंभ लावण्याचा उत्सव महिलांचा’ या टॅग लाईनने गेल्या बुधवार दि. 20 जुलैपासून श्रावणोत्सव -2022 चे आयोजन करण्यात आले आहे.

या श्रावण उत्सवात महिलांसाठी विविध प्रकारच्या लक्षवेधी आकर्षक डिझाईन आणि रंगांच्या साड्या उपलब्ध आहेत. यामध्ये कांजीवरम, धर्मावरम, प्युअर रेशमी साड्या, टिशू लेणींग साड्यांसह विविध कंपन्यांच्या साड्यांचा समावेश आहे.Jai ganesh

विशेष म्हणजे उत्सवात सर्वच साड्या अत्यंत माफक दरामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जय गणेश होलसेल साडी डेपो हे दर्जेदार साड्या मिळण्याचे शहरातील एकमेव ठिकाण आहे.

त्यांचा हा श्रावणोत्सव महिलांना साडी खरेदीसाठी पर्वणीच ठरत आहे. तरी या उत्सवाला अद्याप भेट न दिलेल्या माता-भगिनींनी याची नोंद घेऊन या ‘श्रावणोत्सव -2022’ चा भरभरून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.