केएलएस आयएमईआर संस्थेतर्फे आयोजित बेळगावातील सर्व पदवी, अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक आणि पदव्युत्तर पदवी महाविद्यालयांची आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते.
सदर स्पर्धेत बेळगाव शहरातील एकूण 16 महाविद्यालयांनी भाग घेतला होता. बेळगाव शहरातील सर्व नवोदित फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी केएलएस आयएमईआरतर्फे तीन वर्षांनंतर या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक वुमन सुपर डिव्हिजन लीगसाठी खेळणारी मिस अदिती जाधव ही स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती.
केएलएस आयएमईआर गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन आर.एस. मुतालिक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाने सर्व फुटबॉलपटूंना प्रेरित केले.
केएलएस आयएमईआर संचालक डॉ आरिफ शेख यांनीही मयोचित विचार व्यक्त करून सर्व फुटबॉलपटूंना प्रोत्साहन दिले. याप्रसंगी केएलएस जीआयटीचे प्राचार्य डॉ. जयंत कित्तूर, क्रीडा संचालक पी. व्ही. कडगतकाई, केएलएस आयएमईआर क्रीडा समन्वयक श्रीकांत नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केएलएस आयएमईआर शारीरिक शिक्षण संचालक जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी केले.