श्रीराम सेना हिंदुस्तान तर्फे 24 तास हेल्पलाइन कार्यरत असून त्यानुसार मदतीचा हात गरजूंपर्यंत पोहोचत आहे शहापूर येथील पालकर कुटुंबीयांच्या घराची पडझड होताच कार्यकर्त्यांनी सदर घराला भेट देऊन घराची पाहणी केली व श्रीरामसेने तर्फे आर्थिक मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवली.
शहापूर येथील पालकर कुटुंबीयांच्या घराची भिंत शनिवारी दुपारी कोसळली सदर कुटुंबीयांनी श्रीराम सेनेकडे मदत मागितली
त्यानुसार या भागातील कार्यकर्ते सदर घराकडे पोहोचले व त्यांनी भिंत कोसळलेल्या घराची पाहणी केली पालकर कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती व सध्या पावसामुळे ओढवलेली परिस्थिती याची माहिती घेत त्यांनी लगेचच गरजेनुसार त्यांना आर्थिक स्वरूपात मदत दिली.
यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर उपस्थित होते. त्यांनी बोलताना संघटनेचे कार्यकर्ते तात्काळ मदतीला धावून जात असून यामुळे सर्वसामान्यांपर्यंत मदत पोहोचत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
शिवाय दानशूर व्यक्तींनी या परिस्थितीत गरजूंना आपले कर्तव्य म्हणून थोडीशी मदत करावी असे आवाहन देखील केले.तसेच प्रशासनाने देखील अशा घटनांची दखल घेत मोडकळीला आलेली घरे तसेच पावसामुळे जीर्ण झालेली घरे यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे व निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देखील केली.