राज्यपाल, राज्यसभा सदस्य नियुक्त करतो असे सांगत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला सीबीआयने गजाआड केले आहे.
या संशयिताना अटक करायला गेलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांवर एका आरोपोने हल्ला करत फरार झाला आहे.बेळगावचा रवींद्र नायक सह एकूण चार जणांच्या फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना सीबीआयने अटक केली आहे.
बेळगावचा रवींद्र विठ्ठल नायक,लातूरचा कमलाकर प्रेमकुमार बंडगर, दिल्लीचा महेंद्रपाल तसेच अभिषेक बरा,मोहम्मद बरा खान अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मोठमोठ्या राजकीय नेत्यांना,व्हीव्हीआयपीना संपर्क साधून 100 कोटी रुपये दिल्यास राज्यसभा,राज्यपाल पद मिळवून देतो असे सांगून कोट्यवधी रुपये लुटण्याचा प्रयत्न करत होते ही टोळी सी बी आयच्या कचाट्यात अडकली आहे.अटक केलेले आरोपित बेळगावचा एक आरोपी सामील आहे.