आषाढी एकादशी निमित्त बेळगावहून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती संख्या ध्यानात घेऊन दक्षिण पश्चिम रेल्वेने आषाढी एकादशी स्पेशल ट्रेन आणखी चार दिवस वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.दक्षिण पश्चिम रेल्वेच्या महासंचालकानी(जी एम) ट्विट करून सदर रेल्वे 11 ते 14 चार दिवस वाढवल्याची माहिती दिली आहे.
या अगोदर 9 आणि 10 जुलै रोजी शनिवारी आणि रविवारी दोन दिवस आषाढी एकादशी रेल्वेची घोषणा करण्यात आली होती आता ती आणखी 4 दिवस वाढवण्यात आली आहे.
सोमवार 11जुलै रोजी पहाटे 3 वाजता हुबळीतून सुटणार असून सकाळी 6:00 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचणार असून सकाळो 11:45 वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे तर परतीचा प्रवास पंढरपूर हुन दुपारी 1 वाजता सुरू होणार असुन सायंकाळी 7:15 वाजता बेळगाव तर रात्री 11 वाजता हुबळीला पोचणार आहे.गुरुवारी दि 14 जुलै पर्यंत ही स्पेशल ट्रेन असणार आहे.
मागील काहीं दिवसांपूर्वी सिटीझन कौन्सिलने सहा दिवस रेल्वे सुरू करा अशी मागणी मध्य रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वेकडे केली होती रेल्वे खात्याने सिटीझन कौन्सिलची केवळ मागणीचं नव्हे तर वेळापत्रक देखील मान्य केलं आहे.
आगामी चार दिवसांत पंढरपूर जाणाऱ्या भक्तांसाठी अतिरिक्त वाढवण्यात आलेल्या चार दिवसाची रेल्वे उपयोगी ठरणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्विट केलेला टाईम टेबल ट्विटर लिंक आहे असे
07351/07352 Extended upto 14/07/22 Ashadhi Ekadashi special UBL to PVR.
Passengers kindly note: SWR will run T. No. 07351/07352 SSS #Hubballi – #Pandharpur -SSS Hubballi Unreserved festival special from 11 to 14 July 2022 in view of #AshadhaEkadashi . pic.twitter.com/pMX8LVQdY7
— DRM Hubballi (@drmubl) July 10, 2022