घटप्रभा नदीत मासेमारी करण्यासाठी गेलेला एक मच्छीमार नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने बेपत्ता झाल्याची घटना गोकाक तालुक्यातील सिंगलापूर येथे घडली आली आहे.
बेपत्ता झालेल्या मच्छीमाराचे नांव परशुराम राजू जालगार (वय 27, रा. गोकाक) असे आहे. घटप्रभा नदीवर मासे पकडण्यासाठी गेला असता पाण्याच्या जोरदार प्रवाह हा बरोबर तो वाहून गेल्याचे सांगण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन बेपत्ता मच्छीमारासाठी शोध मोहिम हाती घेतली आहे.
दरम्यान, येडूर -चिक्कोडी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे अनेकांनी सांगितले असून सदर बिबट्याने एका शेळी आणि कुत्र्यावर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला आहे. बिबट्याच्या पायाचे ताजे ठसे मिळाल्यामुळे वन खात्याचे अधिकारी खडबडून जागे झाले आहे.
संबंधित परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी सापळे लावण्यात आले आहेत. तसेच त्या ठिकाणी वनखात्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुक्काम ठोकला असून बिबट्याचा शोध घेतला जात आहे.
बिबट्याच्या आगमनामुळे चिक्कोडीसह गोकाक तालुक्यात मोठी दहशत पसरली असून सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.