मराठा जागृती निर्माण संघातर्फे फ्लाईंग ऑफिसर प्रथमेश प्रदीप चव्हाण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सध्या तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळत असताना प्रथमेश चे यश तरुणाईला प्रेरणा देणारे असून यानिमित्त संघातर्फे हा सन्मान सोहळा पार पडला.
प्रथमेश चव्हाण पाटील यांची एअर फोर्स मधील टेक्निकल विभागात फ्लाईंग ऑफिसर म्हणून त्याची नियुक्ती झाली असून त्यानिमित्त प्रमुख पाहुणे नेताजी जाधव, गोपाळराव बिर्जे ,जयदीप बिर्जे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्याचा सत्कार करण्यात आला
तसेच यावेळी प्रथमेश चव्हाण पाटील याचे आई-वडील यांचा देखील सन्मान नलिनी पाटील तसेच सीए वनिता बिर्जे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रथमेश यांनी सत्काराला उत्तर देताना या यशामध्ये आई-वडील व बहिणीचा हात मोठा असून हे यश आपण कशा पद्धतीने मिळवले याबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना नेताजी जाधव, सीए वनिता बिर्जे तसेच अनंत लाड गजानन सप्रे गुरुजी यांनी प्रथमेश चे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक पाटील,वर्षा बिर्जे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शिरोडकर ,सुभाष पाटील, गिरीश बाचीकर,प्रियांका कळसकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अभियंता जयदीप बिर्जे यांनी केले.