विधानसभा निवडणूक आठ महिन्यावर असताना बेळगावात सर्वच राजकीय पक्षाकडून तयारी सुरू आहे अश्या वेळीं बेळगाव उत्तर मतदार संघात मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले फिरोज सेठ यांनी आगामी 2023 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
शनिवारी दुपारी बेळगाव शहर काँग्रेसची बैठक झाली.बेळगाव उत्तर मतदारसंघ काँग्रेस प्रभारी विश्वनाथ वाघ यांच्या उपस्थितीत बैठक झाली.या बैठकीमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार फिरोज सेठ, काँग्रेस महानगर अध्यक्ष असिफ शेठ ,युवा काँग्रेसचे फैजान सेठ यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग दर्शवला होता.बैठकीत फिरोज सेठ यांनी आपण पुन्हा एकदा 2023 मध्ये निवडणूक लढवण्यास सज्ज आहोत असा निर्धार व्यक्त केलाय.
मागील विधानसभेत पराभूत झालेले फिरोज सेठ यावेळी विश्रांती घेणार आणि त्यांच्या ऐवजी त्यांचे बंधू राजू सेठ हे निवडणुकीला उभे राहतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती मात्र आजच्या बैठकीमध्ये फिरोज सेठ यांनी आपण स्वतः निवडणूक लढवणारच स्पष्ट केलंय.
माजी आमदार फिरोज सेठ ऍक्टिव्ह मोडवर- 2023ची विधानसभा लढवण्याचा निर्धार केला व्यक्त
@firojseth@KPCCPresident @JarkiholiSatish pic.twitter.com/zVojFeULmX— Belgaumlive (@belgaumlive) July 30, 2022
जे 17 आमदार काँग्रेस सोडून गेलेत त्यांच्यामुळे आज काँग्रेस सत्तेतून बाहेर आहे त्या 17 आमदारांना काँग्रेसने कधीही जवळ करू नये असे सांगत सेठ यांनी त्या 17 जणांच्या काँग्रेस सोडून गेल्यामुळेच आज आम्ही त्रासात आहोत
त्यामुळे पक्षाने त्यांना अजिबात जवळ करू नये असे सांगत पुढील वेळी जे आमदार लोकप्रतिनिधी पक्षाला सोडून जाणार नाहीत दगा देणार नाहीत अशांना आपण निवडून आणूया असा निर्धार केला. स्वच्छ प्रशासन आणि स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी पुन्हा एकदा आपण काँग्रेसच्या पाठीशी राहूया असे म्हटले.
पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठीच राज्यात दोन धर्मात ते निर्माण करत आहेत त्याच्यामागे राजकारण आहे. काँग्रेस माइंडेड लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे नाहीतर भविष्यकाळात आणखी परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत. मी सगळ्यांना विनंती आहे माझे वैयक्तिक कोणाशीही वाद नाहीत किंवा भांडण नाहीत मी कुणाशीही स्पर्धा करत नाही देशाची शांतता राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.थोडी गटबाजी असतेच मात्र एकत्र बसून सगळं दूर होईल बेळगाव काँग्रेस मध्ये कोणतेही मतभेद नाहीत असा निर्वाळा देखील त्यांनी दिला.