बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवाराचा लवकरच कायापालट केला जाणार असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज गुरुवारी बेळगाव स्मार्ट सिटीच्या अधिकारी व अभियंत्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय आवाराची पाहणी वजा तपासणी केली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवाराचा कायापालट करण्यासाठी आंदोलनकर्ते, पार्किंग रिक्षा स्टॅन्ड आदींच्या सोयीसाठी लवकरच आराखडा तयार केला जाणार आहे.
त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्मार्ट सिटी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी व अभियंत्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय आभाराची पाहणी केली. तसेच उपस्थित अधिकारी व अभियंत्यांना आवश्यक सूचना केल्या आहेत.
याप्रसंगी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी हे देखील उपस्थित होते. आता लवकरच या आवारातील बॅरिकेड्सच्या जागी सुंदर आकर्षक कमान उभारली जाणार असून अन्य विकास कामे हाती घेतली जाणार आहेत.
त्यामुळे बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय एक आदर्श जिल्हाधिकारी कार्यालय बनणार आहे.