बेळगाव जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या अथनी तालुक्यातील शिरहट्टी गावाला भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली आहे.
महाराष्ट्र लगतच्या सीमेवरील असलेल्या शिरहट्टी गावाला सकाळी 6 :22 वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे.
या भूकंपाच्या सौम्य धक्याची रिश्टर स्केलमध्ये किती मोजणी आहे याची अद्याप माहिती मिळाली नसली तरी हा धक्का सौम्य आहे आणि यामुळे कोणतीच हाणी झाली नसल्याचे समोर आले आहे.
घटनास्थळी अथणीचे डीवायएसपी आणि तहसीलदारांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
असा आहे भूकंपा बद्दल बेळगाव वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा संदेश
Epicentere:
2.3 kms NW of kannur GP Vijaypura taluka Vijayapura district &Maharashtra region
Magnitude:4.4
Date 09.07.2022
Time:06:22:14 am
Co-ordinated:Lat:17.0398°N;Long:75.6818°E
Depth :10kms