Sunday, November 24, 2024

/

अमानुषरित्या डांबलेल्या कुत्र्यांच्या पिलांची सुखरूप सुटका

 belgaum

दारूच्या नशेत एका मद्यपी वॉचमनने अमानुषरित्या शेडमध्ये डांबून ठेवलेल्या दोन असहाय्य निष्पाप कुत्र्यांच्या पिलांची बेळगाव ॲनिमल रेस्क्यू अँड केअर (बार्क) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुखरूप सुटका केल्याची घटना आज दुपारी घडली. तथापि वाचमनच्या निष्ठुरतेमुळे दुर्दैवाने एका पिलाचा पाय मोडला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की शहरातील पार्वती नगर येथील एका लाकडाचे फर्निचर तयार करणाऱ्या एका कारखान्याच्या मद्यपी वॉचमनने दोन दिवसांपूर्वी पाळलेल्या कुत्र्याची दोन पिले चोरून कारखान्याच्या शेडमध्ये डांबून ठेवले होती. त्या दोन्ही निष्पाप पिलांचे चारही पाय बांधून पिले जागची हलू नयेत म्हणून त्याने त्यांच्यावर चक्क एक मोठे अवजड लाकूड ठेवले होते.

त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून अन्य पाण्याविना असलेली ती असहाय्य पिले मोठ्याने केकाटात आक्रोश करत होती. आसपासच्या नागरिकांनी फोन करून याबाबतची माहिती काल रात्री 11:30 च्या सुमारास बार्कच्या कार्यकर्त्यांना दिली. सदर माहिती मिळताच त्यांनी लागलीच पार्वतीनगरला धाव घेतली. मात्र दरवाजा वाजवून आणि आरडाओरड करून देखील दारूच्या नशेत बेहोश झालेल्या वॉचमनने शेडचा दरवाजा न उघडल्याने तसेच कारखान्याच्या मालकांनी फोन न उचलल्यामुळे त्यांना माघारी परतावे लागले.

त्यानंतर बार्कच्या कार्यकर्त्यांनी 112 क्रमांकवर फोन करून पोलिसांना मदत करण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनाही कारखान्याच्या मालकाकडून प्रतिसाद न मिळाल्याने ते देखील कांही करू शकले नाही.Dog

अखेर आज दुपारी बार्कच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा घटनास्थळी जाऊन त्या कुत्र्याच्या पिलांची सुखरूप सुटका केली. त्यावेळी मारहाण किंवा मोठे लाकूड अंगावर ठेवल्यामुळे एका पिलाचा पाय मोडल्याचे निदर्शनास आले.

त्या पिलावर सध्या उपचार सुरू आहेत. या पद्धतीने बारकच्या कार्यकर्त्यांनी त्या असहाय्य पिलांची बंदीवासातून सुटका केल्याबद्दल परिसरातील पशुप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.