बेळगावच्या शहराच्या दक्षिण भागात श्रीराम सेना हिंदुस्तान च्या वतीने डेंग्यू आणि चिकन गुनिया प्रतिबंधक मेगा लसीकरण मोहिमेस रविवारी सकाळी उत्साहात सुरुवात झाली आहे.
रविवारी सकाळी शहापूर भागातल्या विविध गल्ल्यातून वडगाव अनगोळ परिसरात डेंगू आणि चिकनगुनिया प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीलाच सकाळी वयोवृद्ध नागरिक महिला बालक आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात या मोहिमेस प्रतिसाद दिला आहे त्यामुळे शिबीर स्थळी मोठी गर्दी दिसत होती.तर गल्लीतील घरा घरा जाऊन देखील कार्यकर्ते लसीकरण करत आहेत.
श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी विविध ठिकाणी चाललेल्या लसीकरण शिबिराच्या स्थळी भेट देऊन मोहिमेस चालना देण्यात आली. पावसाळ्याच्या सुरुवातीला वडगाव भागामध्ये विशेष करून दक्षिण भागात डासांचा प्रादुर्भाव अधिक असतो त्यामुळे मोठा पाऊस येईपर्यंत साथीचा रोग होण्याची शक्यता असते यासाठी काळजी म्हणून श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेने मेगा लसीकरण शिबिर आयोजित केले आहे.
रविवारचा दिवस सुट्टीचा असल्याने बहुतांश लोक घरीच असतात त्यामुळे सर्व जण चिकनगुनिया आणि डेंगूच्या लसीचा लाभ घेऊ शकतात यासाठी हे शिबिर मुद्दाम रविवारी आयोजित करण्यात आले आहे.बेळगाव दक्षिण भागतिक विविध ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आले. गल्लीतील श्रीराम सेनेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन देखील अनेक ठिकाणी लोकांना लसी देत आहेत.
अनगोळ मधील जवळपास सर्व गल्ल्यांमध्ये राजहंस गल्ली, धर्मवीर संभाजी महाराज चौक, जय महाराष्ट्र चौक, वाडा कंपाऊंड, भांदूर गल्ली, कोनवाळ, नाथ पै नगर, बडमंजी नगर, बाबले गल्ली, स्वामी विवेकानंद रोड, कुरबुर गल्ली, कोरवी गल्ली, संत कनकदास कॉलनी येथे तर वडगांव आनंद नगर येथे या शिवाय शहापूर मधील जेड गल्ली, भोज गल्ली, मेलगे गल्ली, अळवाण गल्ली, बसवाण गल्ली, कोरे गल्ली, सराफ गल्ली,खडेबाजार शहापूर, सह विविध भागात घरोघरी जाऊन डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लस वितरण कार्याला सुरुवात केली आहे.एकूणच श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी लसीकरणाच्या माध्यमातून बेळगाव शहरात दक्षिण भाग पिंजून काढला आहे.