चव्हाट गल्ली येथील एक आरसीसी इमारत कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीर रित्या पाडण्याचे काम सुरू होते. हे काम करत असतानाच अचानक त्याचा पहिला मजला कोसळताच येथील विद्युत वाहिन्यांना धक्का लागल्यामुळे येथील वीजपुरवठा खंडित झाला मात्र कोणत्याही प्रकारची हानी झाली नसून मोठा अनर्थ होता होता टळल्याचे दिसून आले.
चव्हाट गल्ली येथील घर नंबर 4376 येथे पक्की आरसीसी आरसीसी इमारत बेकायदेशीरित्या पाडविण्याचे काम चालू आहे. सदर काम करण्यासाठी महानगर पालिकेकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही.
अधिक लोक वस्ती असणारा हा भाग असताना देखील इमारत पाडवण्यासाठी जेसीबी चा वापर करण्यात येत होता.
जे सी बी च्या हादरऱ्याने परिसरातील घरांना तडे गेले असून आज दुपारी इमारतीचा पहिला मजला पाडवीत असताना स्लॅबचा मोठा भाग घसरून के ए बी च्या मुख्य विद्युत वाहिन्यांवर कोसळला आहे. त्यामुळे मोठे शॉर्ट सर्किट होऊन सबंध भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला.
काहींच्या टीव्ही तर झेरॉक्स मशीन शॉर्ट सर्किट अशी विद्युत उपकरणे यामुळे जळाली असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही हा प्रकार घडतात येथील नागरिकांनी कॉन्ट्रॅक्टरला वेठीस धरून तात्काळ काम बंद पाडले यामुळे बराच वेळ चव्हाट गल्ली परिसरात गोंधळाचे वातावरण झाल्याचे चित्र दिसून आले.