असून अडचण नसून खोळंबा असणारा शहरातील पहिला बस स्टॉप हटविण्यात आला आहे.मध्यवर्ती बस स्थानकाकडून आरटीओ सर्कलकडे येतानाचा किल्ला तलावानजीक असलेला शहरातील पहिल्या बस स्टॉपची अवस्था धोकादायक बनली असून त्याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात होती .फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर यांनी याबाबत प्रथम सदर बस स्टॉप ची अवस्था निदर्शनास आणून दिली होती. याची दखल घेत सदर व स्टॉप त्या ठिकाणाहून हटविण्यात आला आहे
सदर बस स्टॉप शहरातील पहिला बस स्टॉप होता.कारण मध्यवर्तीय बस स्थानकातून शहरात येणारी प्रत्येक बसगाडी पहिल्यांदा या बस स्टॉपवर थांबते. मात्र महापालिकेसह संबंधितांचे याकडे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे शहरातील हा बस स्टॉप धोकादायक स्थितीत पोहोचला होता.
या बस स्टॉपचे पत्रे गंजले असून दर्शनीय छत कोसळण्याच्या अवस्थेत तर . गंजक्या पत्र्याची एक पट्टी थेट बस स्टॉप समोरच लोंबकळत आहे. या बस स्टॉप वर थांबण्याची स्थितीत नव्हती यामुळे उगाचच जागा व्यापलेला हा बस स्टॉप असून अडचण नसून खोळंबा स्थितीत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत होती.
एका बाजूला मोठे भगदाड पडून छताची दुरावस्था झालेला हा बस स्टॉप पहिलाच असल्यामुळे या ठिकाणी सतत बसेस येत असत. परिणामी प्रवाशाला फार वेळ थांबावे लागत नसल्यामुळे स्टॉपवर आसन व्यवस्था ही करण्यात आलेली नव्हती.येथील छत गंजून मोडकळीस आल्यामुळे अलीकडे प्रवासीवर्ग बसच्या प्रतीक्षेत बस स्टॉप पासून दूर किल्ला तलावाच्या सिग्नल जवळ थांबलेले पहावयास मिळत होते.
सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसात त्यांच्यासाठी ते गैरसोयीचे ठरत आहे. सदर बस स्टॉपची दुरूस्ती करावी अशी मागणी केली जात होती. तरी या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत . विभागाने याबाबतची दखल घेत सदर बस स्टॉप ची दुरुस्ती करण्यापेक्षा सदर बस स्टॉप तेथून हटविला आहे.