ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शेती या व्यवसायाबरोबर पशुधन हीच त्यांची संपत्ती असून हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.मात्र ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय परीक्षकांच्या जागा रिक्त असून यामुळे पशुधन धोक्यात आले आहे.
याशिवाय येथील अंगणवाड्या व त्यांची दुरावस्था पाहता अंगणवाड्यांचे संख्या देखील वाढवण्याची आवश्यकता आहे याबरोबरच सुरळीत रेशन पुरवठा करण्यात यावा व येथील नागरिकांच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी भाजप नेत्या डॉ.सोनाली सरनोबत यांनी केली आहे.
खानापूर तालुक्यातील परिस्थिती पाहता नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन यांच्याकडे निवेदनाद्वारे सदर तीन मागण्या केल्या आहेत. येथील परिस्थिती पाहता अनेक गावांमध्ये पशुवैद्यकीय परीक्षक नाहीत त्यांच्या जागा रिक्त आहेत. शिवाय अंगणवाड्यांची पुरेशी सोय नाही तसेच अपुरा रेशन पुरवठा यामुळे येथील जनतेला समस्यांचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यातील जनतेसाठी प्रामुख्याने पशुधन तसेच घरातील मुलाबाळांची काळजी शिवाय पोटासाठी रेशन या मुख्य तीन बाबी महत्त्वाच्या असून या दृष्टिकोनातून लवकरात लवकर या तीन मागण्यांची पूर्तता करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली आहे.
प्रामुख्याने खानापूर तालुक्यातील पारिशवाड या गावातील परिस्थिती देखील कठीण असून परिणामी येथील नागरिकांना पशुधनाची चिंता वाटू लागली आहे. तात्काळ पशुवैद्यकीय परीक्षकांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी भाजप नेत्या डॉ.सोनाली सरनोबत यांनी केली.
खानापुर तालुक्यातील हे गाव सुमार लोकसंख्या असलेला असून जिल्हा पंचायत मतदार संघ आहे.यापूर्वीच येथील पशुवैद्यकीय परीक्षकाची बदली करण्यात आली असून परिणामी पशुंच्या आरोग्याची काळजी घेताना येथील शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे.या
मुळे जनतेच्या हिताचा विचार करून प्राण्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून पशुवैद्यकीय परीक्षकाची नियुक्ती करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले. गेल्या कित्येक महिन्या पासून सुरळीत रेशन पुरवठ्यासाठी कार्यरत असणाऱ्या डॉ सरनोबत यांनी तालुक्यातील अनेक गावांत रेशन पुरवठा व्यवस्थित करा अशी मागणी केली आहे.
खानापूर तालुक्यातील विविध समस्या सोडवा-भाजप नेत्या डॉ सोनाली सरनोबत यांची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे मागणी @DcBelagavi @drsonalisameer pic.twitter.com/X3ASS7UpNH
— Belgaumlive (@belgaumlive) July 14, 2022