Monday, December 23, 2024

/

पूरग्रस्त शेत जमिनींची कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी

 belgaum

सध्याच्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर येऊन यंदा देखील परिसरातील शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचा अहवाल तयार करण्यासाठी आज शुक्रवारी सकाळी कृषी अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त शेतजमिनींचा पाहणी दौरा केला.

बळारी नाल्याच्या पुरामुळे अनुभव येईल वडगाव, अनगोळ, शहापूर, धामणे, जुने बेळगाव आणि हलगा येथील शिवारांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे या भागातील प्रामुख्याने भात पिके वाया गेल्या जमा असून यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पीक नुकसानीचा अहवाल तयार करण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी सकाळी उपरोक्त भागातील शेत जमिनीचा पाणी दौरा केला.

यावेळी शेतकरी नेते राजू मरवे यांनी कृषी अधिकाऱ्यांसमवेत उपस्थित होते त्यांनी अधिकाऱ्यांना येळ्ळूर रोड ते येळ्ळूरच्या सीमेपर्यंतच्या शेतजमिनी त्याचप्रमाणे वडगाव शिवार ते लाड फार्म हाऊसपर्यंत, येरमाळ रोड आदी परिसरातील पाण्याने भरलेल्या शेतजमिनी दाखवून पिकांच्या नुकसानीची माहिती दिली.

पाहणी प्रसंगी कृषी अधिकाऱ्यांनी बळ्ळारी नाला परिसरातील सुमारे 300 एकर शेतीचे नुकसान झाले असे आपण आपल्या अहवालात नमूद करणार असल्याचे सांगितले. मात्र राजू मरवे यांनी त्याला आक्षेप घेऊन नुकसान झालेल्या शेतजमिनीचे क्षेत्र 800 ते 1000 एकर पर्यंत घालण्याची मागणी केली. आज प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे अधिकाऱ्यांना देखील मरवे यांची मागणी योग्य वाटल्याने त्यांनी नुकसानग्रस्त शेत जमिनीच्या क्षेत्रात वाढ करण्याचे आश्वासन दिले.Crop loss inspection

यावेळी अधिकाऱ्यांशी बोलताना राजू मरवे यांनी बळारी नाल्याची वेळच्यावेळी साफसफाई केली जात नसल्यामुळे या नाल्याचा विकास करण्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांना कसा फटका बसतो याची माहिती दिली. तसेच आम्हा शेतकऱ्यांना एक वेळ नुकसान भरपाई दिली नाहीत तरी चालेल परंतु पहिल्यांदा बळ्ळारी नाल्याची समस्या निकालात काढा. या नाल्याची साफसफाई करून त्याचा विकास करा बाकी आम्हाला काहीही नको, असे मरवे यांनी स्पष्ट केले.

आजच्या या पाहणी दौऱ्यात कृषी खात्याचे संयुक्त संचालक एस. एस. पाटील, डीडीए एच. डी. कोलकार, एएओ गुडीमणी, एडीए आर. बी. नायकर आणि कृषी अधिकारी श्रीमती वज्रेश्वरी कुलकर्णी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.