हवामान खात्यातर्फे बेळगाव जिल्ह्यात गेल्या मंगळवार दि. 12 ते आज शुक्रवार दि. 15 जुलैपर्यंत नोंद झालेल्या पावसाचा तपशील जाहीर करण्यात आला असून बेळगावमध्ये आज या मोसमातील सर्वाधिक म्हणजे 51.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे आज जिल्ह्यात सर्वाधिक 61.4 मि. मी. पाऊस खानापूर तालुक्यात नोंदविला गेला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सर्व पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस नोंदवला गेला असता तरी मुडलगी येथे मात्र आज शुक्रवारी ‘शून्य’ पावसाची नोंद झाली आहे. खानापूर तालुक्यात सर्वाधिक तर रामदुर्ग तालुक्यात 0.5 मि. मी. इतका सर्वात कमी पाऊस पडला आहे. या चार दिवसात खानापूर तालुक्यामध्ये गेला बुधवार वगळता अन्य दिवशी 40 मि. मी. पेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी झाली आहे.
बेळगाव येथे याच कालावधीत गेल्या तीन दिवसाच्या तुलनेत आज शुक्रवारी दुप्पट पाऊस नोंदविला गेला आहे बेळगाव सर्किट हाऊस येथील पर्जन्यमापन केंद्रात दरवर्षी जुलै महिन्यात सरासरी 455 मि. मी. पावसाची नोंद होते, सध्या म्हणजे अवघ्या 15 दिवसातच या ठिकाणी सरासरीच्या अर्ध्याहून अधिक म्हणजे 256.9 मि. मी. पाऊस नोंदविला गेला आहे. जुलैमध्ये सरासरी 756 मि. मी. पाऊस होणाऱ्या खानापूर तालुक्यात आजपर्यंत 492.4 मि. मी. पाऊस झाला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी जुलै महिन्यात नोंदविला जाणारा सरासरी पाऊस आणि गेल्या 12 जुलैपासून पडलेल्या पावसाची नोंद (अनुक्रमे पर्जन्यमापन केंद्र, सरासरी पाऊस, 12, 13, 14 व 15 जुलै रोजी पडलेला पाऊस यानुसार) पुढीलप्रमाणे आहे. अथणी एचबीसी : 65 मि.मी., 6.8 मि.मी.,15.0 मि.मी., 7.0 मि.मी., 2.8 मि.मी. बैलहोंगल : 129 मि.मी., 14.4 मि.मी., 4.2 मि.मी., 9.3 मि.मी., 8.8 मि.मी. बेळगाव आयबी : 455 मि.मी., 24.0 मि.मी., 10.6 मि.मी., 18.0 मि.मी., 51.2 मि.मी. चिक्कोडी: 134 मि.मी., 14.8 मि.मी., 12.3 मि.मी., 13.3 मि.मी., 7.3 मि.मी. गोकाक : 68 मि.मी.,
7.1 मि.मी., 3.0 मि.मी., 2.4 मि.मी., 1.2 मि.मी. हुक्केरी एसएफ : 150 मि.मी., 13.2 मि.मी., 5.4 मि.मी., 6.0 मि.मी., 4.1 मि.मी. कागवाड (शेडबाळ) : 68.5 मि.मी., 8.8 मि.मी., 4.6 मि.मी., 9.2 मि.मी., 3.4 मि.मी. खानापूर : 756 मि.मी., 41.0 मि.मी., 37.5 मि.मी., 41.2 मि.मी., 61.4 मि.मी. कित्तूर : 270 मि.मी., 18.6 मि.मी., 14.3 मि.मी., 21.3 मि.मी., 14.3 मि.मी. मुडलगी :
67 मि.मी., 8.1 मि.मी., 4.3 मि.मी., 3.0 मि.मी., 0.0 मि.मी. निपाणी आयबी : 201.8 मि.मी., 21.2 मि.मी., 19.0 मि.मी., 16.0 मि.मी., 18.4 मि.मी. रायबाग : 74 मि.मी., 6.8 मि.मी., 4.7 मि.मी., 4.0 मि.मी., 1.2 मि.मी. रामदुर्ग : 64 मि.मी., 8.2 मि.मी. 2.2 मि.मी., 2.3 मि.मी., 0.5 मि.मी. सौंदत्ती : 76 मि.मी. 12.4 मि.मी. 3.4 मि.मी., 4.4 मि.मी., 3.2 मि.मी.