बेळगावच्या चिमुकल्याने कार्टव्हिल मध्ये नवा विक्रम केला आहे त्याची नोंद इंटरनॅशनल बुक रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे त्यामुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा शिरपेच खोवला गेला आहे.
कोणत्याही शहराचं नाव उज्वल करायला वयाची बंधन नसतात केवळ तीन वर्षे सहा महिने दहा दिवस वय असलेल्या श्रीश चव्हाण या चिमुकल्याने दाखवून दिले आहे.श्रीश या कंग्राळी खुर्दच्या युवकाने अवघ्या 30 सेकंदामध्ये 27 वेळा कार्टव्हिल मारत नवा विश्वविक्रम नोंदवला आहे.
कंग्राळी खुर्द रामनगर तिसऱ्या क्रॉस येथील अंजना चव्हाण यांचा सुपुत्र श्रीश यांने बेळगावच्या जिल्हा क्रीडांगणावर 24 जुन रोजी कार्टव्हिल ची प्रात्यक्षिक सादर केली होती त्यावेळी त्यांनी अवघ्या 30 सेकंदामध्ये मध्ये 27 वेळा कार्टव्हिल काढत विश्वविक्रम केला होता या विक्रमाची दखल घेत आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डने नोंद करून त्याला प्रमाणपत्र आणि पदक दिले आहे.
आपली आई अंजना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीश हा नियमित जिल्हा क्रीडांगणावर सराव करत आहेत त्याला आजोबा शंकर चव्हाण आजी शोभा चव्हाण मामा कृष्णा चव्हाण यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
श्रीशच्या आई अंजना यांनी त्याला यु ट्यूब वर पाहून कार्टव्हिल मारायचा व्यायाम शिकवला अन त्याने इतक्या कमी वयात या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे त्यामुळे अंजना चव्हाण यांचेही कौतुक होत आहे. बेळगावात स्केटिंग खेळाडू रोहन कोकणे, अनिकेत चिंडक या सारख्या अनेक स्केटिंग खेळाडूंनी बालपणात एकदम लहान वयात यश मिळवले आहे श्रीश चव्हाण देखील याच मुलांच्या पंक्तीत बसला आहे.
YOUNGEST TO PERFORM MAXIMUM NUMBER OF CARTWHEELS IN 30 SECONDS https://t.co/Hl8i4ctpcy via @YouTube
— International Book of Records (@ibrecord) July 13, 2022