Monday, November 25, 2024

/

‘बेळगाव विमान तळाचा कृषी उडान यादीत समावेश’

 belgaum

बेळगाव सह दरभंगा, जबलपूर झरसूगडा आणि भोपाळ या पाच शहरातील विमानतळांचा सध्या देशात असलेल्या कृषी उडान:2 विमानतळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. प्रवासी विमानतळाच्या बाबतीत अग्रेसर असलेला बेळगाव विमानतळावरून आता कार्गो विमान सेवा ही लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे बेळगाव परिसरातील कृषी माल भाजी आदी देश विदेशात पोहोचण्यासाठी मदत होणार आहे.

उडान:1 मध्ये प्रवाशी विमान योजनेत बेळगाव विमान तळाचा समावेश झाला होता त्यामुळे इतकी विमान बेळगावहुन झेप घेत आहेत या योजनेचा पुरस्कार देखील बेळगावला मिळाला होता आता कृषी उडान योजनेत देखील बेळगावचा समावेश झाला आहे.

भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) च्या सहकार्याने कृषी उडान 2.0 च्या मूल्यमापनासाठी भागधारक कार्यशाळेचे आयोजन केले होते. या परिषदेने कृषी उडानचे फायदे अधोरेखित करण्यासाठी एअर कार्गो क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणले आणि देशांतर्गत एअर कार्गो विकासासाठी कसे कार्य करू शकतात आणि मूल्य शृंखलामध्ये अखंड व्यवहार कसा निर्माण करू शकतात यावर चर्चा करण्यात आली.

कार्यशाळेचे अध्यक्ष MoCA सचिव राजीव बन्सल तर सूत्रसंचालन एमओसीएच्या सचिव श्रीमती. उषा पाध्ये यांनी केलं.
कार्यशाळेला मत्स्यव्यवसाय विभाग, देशभरातील 26 विमानतळ संचालकांनी (APDs) आणि भारतीय हवाई कार्गो क्षेत्रातील इतर विविध भागधारकानी भाग घेतला होता.

Ushaa padhee
कृषी उडानवरील कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित करताना, राजीव बन्सल,म्हणाले, “अशा कार्यशाळेमुळे अर्थपूर्ण चर्चा होण्यास आणि नवीन कल्पनांसाठी विचारमंथन सत्र कार्य करण्यास मदत होते. कोविड-19 महामारीच्या 2 वर्षांच्या काळात, विमान कंपन्यांच्या शाश्वत पर्यायांमध्ये मालवाहतूक महत्त्वाची भूमिका बजावू शकते याची मोठी जाणीव झाली. आपला देश हा एक विशाल देश आहे ज्याने कृषी उत्पादनात विविधता आणली आहे आणि कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ करणे एअरलाइन आणि विमानतळाच्या हिताचे आहे ज्यामुळे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थानिक उत्पादकांना पुरेशी मागणी निर्माण होईल. आम्ही (MoCA) वाहतूक अनुदान योजनेबाबत कृषी विभाग आणि राज्य सरकारांच्या मदतीने काही पथदर्शी प्रकल्पांवर काम करण्यास इच्छुक आहोत ज्यामुळे जलद वाहतुकीस मदत होईल.”

श्रीमती उषा पाध्ये यांनी “कृषी उडान 2.0 मूल्यांकन” या विषयावर सादरीकरण केले, ज्यामध्ये कृषी उडानची उपलब्धी, व्याप्ती, कृषी उद्योगावरील परिणाम आणि भविष्यावर प्रकाश टाकला. विविध विमानतळांच्या संदर्भात योजनेच्या कामगिरीवरही चर्चा करण्यात आली.

कृषी उडान विमानतळांच्या सध्याच्या 53 यादीमध्ये बेळगाव, झारसुगुडा, जबलपूर, दरभंगा आणि भोपाळ ही 5 नवीन विमानतळे समाविष्ट होणार आहेत, अशी माहितीही देण्यात आली. यासह, 58 विमानतळ कृषी उडानमध्ये सक्रियपणे सहभागी होणार आहेत.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.