Thursday, January 9, 2025

/

बेळगावचे ते 32 यात्रेकरू शेषनाग कॅम्प मध्ये सुखरूप

 belgaum

अमरनाथ यात्रे दरम्यान ढगफुटी होऊन 16 भाविक दगावले आणि कित्येक जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत असताना बेळगाव शहर आणि परिसरातील 32 यात्रेकरू युवक शेषनाग मधील कॅम्प मध्ये सुखरूप आहेत.

बेळगाव शहर आणि परिसरातील 32 युवकांची तुकडी अमरनाथ यात्रेत सहभागी झाले असून ते सुखरूप आहेत. ढगफुटी होऊन दुर्घटना झाल्याच्या पाश्वभूमीवर शनिवारी यात्रेकरूना पुढे जाण्यास थांबवण्यात आले आहे .बेळगावच्या 32 जणांच्या तुकडीत नगरसेवक शिवाजी मंडोळकर,संभाजी मेलगे,मोहन शहापुरकर, मारुती बंबरगेकर महादेव कुडचीकर आदी सहभागी आहेत.

बेळगाव परिसरातील शिवाजीनगर, महाद्वार रोड,निलजी,बसवण कुडची आणि हिंडलगा येथील 32 जण अमरनाथ यात्रेसाठी 1 जून रोजी बेळगावातून निघाले होते.18 जुलैचा त्यांचा बेळगावचा परतीचा प्रवास आहे मात्र तो यात्रा कधी संपते त्यावर अवलंबून असणार आहे.वैष्णोदेवी आणि इतर दर्शन करून ते 7 जुलै रोजी पहलगामला पोहोचले तिथून अमरनाथ यात्रेचा प्रवास सुरू केला शनिवारी अमरनाथ गुहे पासून 20 कि. मी. दूर शेषनाग येथील छावणीत सुरक्षित आहेत.पहलगाम…शेषनाग…पिशटॉप गणेशटॉप चंदनवाडी पासून 3 कि. मी गुहा असा त्यांचा प्रवास आहे.

Amarnatyatra

शिवाजीनगर येथील नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी बेळगाव live ला फोन करून 32 सर्वजण सुखरूप असल्याची माहिती देत जर वातावरण साफ असेल तर उद्या(रविवारी पुढच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे असे सांगितले. बेळगावची तुकडी अद्याप  अमरनाथ गुहेपासून 20 की.मी लांब आहे सरकारच्या परवानगीनंतर ते पुढचा प्रवास करणार आहेत.

काल पासून त्यांचा पुढचा प्रवास सुरु होणार होता मात्र ढगफुटीच्या घटनेनंतर शेषनाग येथील कॅम्प मध्ये यात्रेकरूंना अडविण्यात आले आहे दुर्घटने नंतर काही लोक परत जात आहेत तर काही जण यात्रा पूर्ण करून दर्शन घेऊनच जाण्यासाठी थांबले आहेत असेही मंडोळकर यांनी सांगितले.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.