उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या उद्योजक संस्थाचा दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो या प्रमाणे यंदाही बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने देण्यात येणार्या पुरस्कारांचे उत्साहात वितरण करण्यात आले. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, व्ही टी यू चे रजिस्टर डॉ आनंद देशपांडे आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे माजीअध्यक्ष पंचाक्षरी चोन्नद यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण झाले.
शनिवारी सायंकाळी फौंडरी क्लस्टर उद्यमबाग येथील सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
स्नेहम इंटरनॅशनल या संस्थेला 2021-22 यावर्षीचा इंडस्ट्रीयल डेवलोपमेंट प्रोजेक्ट आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये दिलीप दामले मेमोरियल ट्रस्ट पुरस्कार,दीपक कन्स्ट्रक्शन यांना यावर्षीचा बेस्ट ट्रेडर्स म्हणून बसप्पा बाळाप्पा कगणगी मेमोरियल अवॉर्ड,
बेस्ट अपकमिंग ट्रेडर्स पुरस्कार कै. मधुकर विठ्ठल हेरवाडकर यांच्या स्मरणात देण्यात येतो तो हायटेक मोटर्स आणि ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला आणि माणिकबाग ऑटोमोबाईल्स यांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा एक्सलन्स अवॉर्ड ऑटोमोबाईल आणि ट्रेड इंडस्ट्री म्हणून पॅटसन ऑटोमोबाईल प्रा. लिमिटेडला प्रदान करण्यात आला.
यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रोहन जुवळी तर सचिव प्रभाकर नागर मूनवळळी सह चेंबरचे सदस्य उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.