अथणी शुगर्स लि., ला उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गोवा राज्यातील पणजी येथे नुकताच आंतरराष्ट्रीय 80 वा वार्षिक शुगर एक्स्पो 2022 समारंभ झाला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री श्रीमती साध्वी निरंजन ज्योती यांच्या हस्ते कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
गोवा येथे दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने (एसटीएआय) नुकतेच शुगर एक्स्पो 2022 या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशभरातील विविध उद्योग व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींना गौरवण्यात आले.
याचवेळी कागवाड तालुक्यातील अथणी शुगर्स लि., उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. गेल्या 22 वर्षापासून अथणी, कागवाड तालुक्यांसह या परिसरातील तसेच महाराष्ट्रातील शेतकर्यांची अथणी शुगर्स लि., तारणहार ठरली आहे. याचा विचार करून केंद्रीय मंत्री व गोवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी आपले मनोगत मांडताना सांगितले की, या यशात कारखान्याचे व्यवस्थापन मंडळ. सर्व विभागांमधील अधिकारी, कर्मचारी यांचा मोठा सहभाग आहे. परंतु यापेक्षा अधिक मोलाचा वाटा हा ज्यांनी आपल्या व्यवस्थापनावर विश्वास ठेऊन ऊस पुरवठा केला त्या शेतकर्यांचा आहे.
यावेळी केंद्रीय साखर तंत्रज्ञान संघाचे अध्यक्ष संजय अवस्थी, राष्ट्रीय साखर संस्थेचे नरेंद्र मोहन यांच्यासह साखर उद्योगाशी संंबंध विविध राज्यांमधील वरिष्ठ पदाधिकारी, व्यवस्थापकीय संचालक आदी उपस्थित होते.