कर्नाटक सरकारने राज्यातील 31 जिल्ह्यांसाठी प्रभारी सचिवांच्या नेमणुका केल्या असून बेळगाव जिल्हा प्रभारी सचिव म्हणून एल. के. अतिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या प्रशासन सुधारणा खात्याने यासंबंधीचा आदेश बजावला आहे.
राज्यातील विकास कामांची अंमलबजावणी, पडताळणी, अर्ज -निवेदनांवर विचारविमर्श, अचानक भेटी देऊन कामांची पाहणी करणे, सरकारकडे अहवाल सादर करणे आदी कामे प्रभारी सचिव करणार आहेत.
राज्य सरकारचे अप्पर मुख्य सचिव मुख्य सचिव व सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या योजनांना गती देण्यासाठी व त्यांची पारदर्शकपणे अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार बेळगाव जिल्हा प्रभारी सचिव म्हणून एल. के. अतिक, तर धारवाड जिल्हा प्रभारी सचिवपदी डॉ. आर. विशाल, गदग जिल्ह्यासाठी मोहम्मद मोहसिन, विजापूरसाठी डी. रणदीप, कारवारसाठी पी. हेमलता, बागलकोटसाठी शिवयोगी कळसद, गुलबर्गासाठी सलमा फाहिम,
यादगिरसाठी मुनिश मौदगील, बळ्ळारीसाठी डॉ. एम. एन. अजय नागभूषण, बिदरसाठी रिचर्ड डिसोजा, हावेरीसाठी मेजर मणीवन्नण पी. आणि विजापूर जिल्हा प्रभारी सचिव पदी तुलसी मद्दीनेनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.