Tuesday, January 14, 2025

/

‘अष्टे येथील युवकाचा प्रामाणिकपणा’

 belgaum

अडीच हजार रुपये रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे असलेले रस्त्यावर पडलेले पाकीट परत करत अष्टे (चंदगड) येथील युवकाने प्रामाणिकपणा दाखवला आहे त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे.

सोमवारी रात्री बेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांच्या खिश्यातील पाकीट अचानकपणे कणबर्गी रोडवर पडले होते त्यावेळी अष्टे येथे रहाणारे युवक निखिल तरळे यांना ते सापडले होते. लागलीच बेळगाव live च्या फेसबुक पेज वर पाकीट हरवल्याची पोस्ट देखील करण्यात आली सदर पोस्ट पाहून निखिल यांनी बेळगाव live शी संपर्क करून सदर पाकीट मिळाल्याचे सांगितले आणि परत करत प्रामाणिकपणा दाखवला आहे.

यावेळी उपस्थित असणाऱ्या श्री राम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष विकास कलघटगी यांनी अष्टे गाठत प्रामाणिक पणा दाखवणाऱ्या युवकाचे खास कौतुक केले.Youth sincerity

टाईल्स फिटिंग कामाला जाऊन रोजंदारी करणाऱ्या युवकाने प्रामाणिक पणा दाखवत रस्त्यावर पडलेले पाकीट त्यातील कागदपत्रे आणि रोख रक्कम परत करत आजही या जगात प्रामाणिक लोकं आहेत हेच दाखवुन दिले आहे.यावेळी संतोष धुडूम यांच्यासह अष्टे येथील युवक उपस्थित होते.

अश्या प्रामाणिकपणाच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात मात्र आजच्या धाकधुकीच्या जगात प्रामाणिक पणाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जेणे करून समाज मन प्रामाणिकते कडे वळवण्यासाठी सगळ्यांना कळणे गरजेचे आहे.

‘त्या’ पोस्ट मुळे सापडले पाकीट

पाकीट रस्त्यावर हरवताच लागलीच बेळगाव live वर बातमी प्रसारित करण्यात आली त्याची दखल घेत पाकीट सापडलेल्या निखिल याने दूरध्वनीवर संपर्क साधून पाकीट परत केले या अगोदर बेळगाव live च्या माध्यमातून अनेकदा हरवलेले सामान परत मिळाले आहेत अशी अनेक उदाहरणे घडली आहेत त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली.बेळगाव live ची ओळख अनेकांची मदत करणारे, शहरातील लोकांचे माध्यम बनलेले न्युज चॅनेल अशी ओळख बनली आहे.

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.