सदाशिवनगर येथील घरफोडी करून लाखोंचा ऐवज घेऊन लंपास झालेल्या चोरट्याला गजाआड करण्यात ए पी एम सी पोलिसांना यश आले आहे.अटक केलेल्या चोरट्या कडून 3 लाख 75 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
सदाशिवनगर येथील सविता वेंकटेश लमानी यांच्या घरी चोरी झाली होती.यात 65 हजार रुपये रोख रक्कम,13 ग्रॅम सोन्याचा नेकलेस,3 लाख 10 हजार किंमतीचे61 ग्रॅम सोन्याचे गंठन लंपास करत सदर चोरटा फरारी झाला होता.या प्रकरणी ए पी एम सी पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली होती.
पोलीसात फिर्याद दाखल होताच पोलीस आयुक्त डॉ एम बी बोरलिंगय्या डीसीपी स्नेहा आणि मार्केट उपविभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलिसांचे एक पथक तयार करत चौकशीचे आदेश दिले.
सदर पथकाने सौंदत्ती येथील अलदकट्टी गावच्या 33 वर्षीय अर्जुन सोमाप्पा लमानी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता अर्जुन याने चोरी केल्याचे पोलीस तपासात कबूल केले आरोपीकडून पोलिसांनी तीन लाख 75 हजारच्या सोन्याचे दागिने जप्त केले आहेत आणि आरोपीची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.