लष्कर भरती कार्यालय अर्थात आर्मी रिक्रुटींग ऑफिस बेळगावतर्फे येत्या दि. 5 ते 22 डिसेंबर 2022 या कालावधीत बिदर येथील नेहरू स्टेडियम येथे लष्कराच्या अग्निपथ भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हेडकॉर्टर रिक्रुटींग झोन बेंगलोर यांच्या आश्रयाखाली आयोजित हा अग्निपथ भरती मेळावा बेळगाव, बिदर, गुलबर्गा, कोप्पळ, रायचूर आणि यादगिर या सहा जिल्ह्यांमधील स्वयंसेवक पुरुष उमेदवारांसाठी मर्यादित असणार आहे.
अग्नीवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्नीवीर ट्रेडसमन 10 वी उत्तीर्ण, अग्नीवीर ट्रेडसमन 8 वी उत्तीर्ण, अग्नीवीर क्लार्क /स्टोअर किपर टेक्निकल कॅटेगिरी यासाठी हा भरती मेळावा होणार आहे.
लष्करातील भरतीसाठी संबंधित श्रेणीकरिता आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर निकष यांची माहिती आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस बेळगावतर्फे येत्या 30 जुलै 2022 रोजी जाहीर केल्या जाणाऱ्या प्रसिद्धी पत्रकात नमूद असणार आहे.
अग्निपथ भरतीसाठीची ऑनलाइन नांव नोंदणी (रजिस्ट्रेशन) येत्या दि. 5 ऑगस्ट ते दि. 3 सप्टेंबर 2022 या कालावधीत खुले असून इच्छुकांनी Joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर नांव नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे.
नांव नोंदणी नंतर उमेदवारांचे ॲडमिट कार्ड त्यांच्या रजिस्टर ईमेलवर दि. 10 ते 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत पाठविले जाईल. तरी अग्निपथ योजनेद्वारे लष्करात भरती होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या युवकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.