देव तयारी त्याला कोण मारी! या उक्तीची प्रचिती आज बेळगावमधील शहापूर भागात आली आहे.
बेळगावमध्ये सायंकाळी ४ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या पावसात अनेक ठिकाणी घरांची, झाडांची पडझड झाली असून बसवाण गल्ली, शहापूर येथील शालन भरमा धामणेकर यांच्या घरावरील छत कोसळले आहे.
शहापूर बसवाण गल्ली येथे राहणाऱ्या शालन धामणेकर या ८० वर्षांच्या आजीबाई दुपारच्या वेळेत विश्रांती घेत होत्या. अचानक सुरु झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे शालन धामणेकर या आजीच्या अंगावर घरावरील छत कोसळले. देव तारी त्याला कोण मारी! याप्रमाणेच या घटनेत आजीबाई सुखरूप बचावल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 27चे नगरसेवक रवी साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याचप्रमाणे शहापूर विभागाचे तलाठीनिही या ठिकाणी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आहे.
एकूणच गुरुवारी दुपारी बेळगावात अचानकपणे बदल झाला गर्मी कमी होऊन वातावरण गार झाले मग पाऊस आला यापावसात अनेक ठिकाणीची ड्रीनेजचे पाणी शहरातील रस्त्यावर आले होते.