राज्यातील पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या परीक्षेचा (सेकंड इयर पीयुसी) निकाल उद्या शनिवार दि. 18 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी आज शुक्रवारी त्यासंबंधीची घोषणा केली आहे.
राज्यातील पीयूसी द्वितीय वर्षाची यंदाची परीक्षा गेल्या 22 एप्रिल ते 18 मे या कालावधीत घेण्यात आली होती. परीक्षेच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांना उत्सुकता लागून राहिली होती.
आता उद्या शनिवारी दुपारी 12 वाजता या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्याचे मंत्री बी. सी. नागेश यांनी बेंगलोर येथे आज या परीक्षा निकालाबाबतची घोषणा केली.
बेळगाव शहरासह राज्यभरात बारावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.