प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या प्रतिकृतीस भर रस्त्यात गळफास लावत सदर प्रतिकृती टांगण्याचा प्रकार केलेल्या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे.
शुक्रवारी सकाळी बेळगाव शहरातील फोर्ट रोड येथे नुपूर शर्मा यांच्या प्रतिकृतीला फाशी देऊन टाकण्याचा प्रकार घडला होता याप्रकरणी सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.
या प्रकरणी बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शहरात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळत शांतता ठेवा आणि नुपूर शर्मा यांच्या प्रतिकृतीला फाशी देण्याचा प्रकार करणाऱ्यांची चौकशी करा अशी मागणी केली होती त्यानंतर पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आदींची तपासणी करत चौकशी करून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी मार्केट पोलिसांत सो मोटो गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर यांनी गुन्हा नोंदवून घेतला होता आणि अधिक तपास चालवला होता.
शुक्रवारी सकाळी सात वाजता रोडमध्ये शर्माच्या प्रतिकृतीला फाशी लावून प्रतिमा टांगण्यात आली होती रविवारी या प्रकरणातील संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे.